स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या हाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या हाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

चार परप्रांतीय मुलींची सुटका । एक महिला पोलिसांच्या ताब्यात


। अहमदनगर । दि.22 डिसेंबर 2023 । शिर्डी येथील स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली. तर एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

👉तळेगाव दिघेत एटीएम फोडून पावणेपाच लाख पळवले

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडच्या बाजूला स्पा सेंटरच्या नावाखाली येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालूच वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता, अशी खात्रीशीर बातमी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती, त्यानंतर मिटके यांनी स्वतः पथक नेमून चक्रे फिरवली. याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून पीडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली.

👉आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची रेमडेसिव्हिर घोटाळ्यात चौकशी

या ठिकाणाहून एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीविरुध्द अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादिवरुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 

👉धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, हेड कॉस्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, बाबा खेडकर, कॉस्टेबल सुनंदा भारमल, पोलीस नाईक श्याम जाधव, दिनेश कांबळे, सोमेश गरदास, हेड कॉस्टेबल अप्पासाहेब थोरमिसे यांनी केली.

👉फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केली 6 लाखाच्या साहित्याची अफरातफर 

Post a Comment

Previous Post Next Post