धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले

धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले

। अहमदनगर । दि.20 डिसेंबर 2023 : पतीसह मोटर सायकलवरून लग्न समारंभा करिता जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मोटार सायकल वरून आलेल्या दोन आरोपी चोरट्याने हिसकावून तोडून दोन स्टाईलने चोरून नेले. 

👉फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केली 6 लाखाच्या साहित्याची अफरातफर

सदरची घटना नगर तालुक्यातील आशीर्वाद लॉन ते निमगाव वाघाचे दरम्यान रोडवर घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सौ शारदा चंद्रशेखर केदार (वय 49 राहणार द्वारका कॉम्प्लेक्स पेट्रोल पंपा समोर बालिकाश्रम रोड सावेडी अहमदनगर) 

👉खा. सुळे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित

यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल वरील दोन अनोळखी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 392 अन्वये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.

👉दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल  

Post a Comment

Previous Post Next Post