फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केली 6 लाखाच्या साहित्याची अफरातफर

। अहमदनगर । दि.19 डिसेंबर 2023 ।  मुंबई येथून नागपूरकडे पाठवलेल्या मालट्रक मधील मशीन व बॅटरी फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन मालट्रक मशीन व बॅटरी असे सहा लाख पाच हजाराच्या साहित्याची फसवणूक केल्याची घटना केडगाव बायपास येथे घडली.

सागर प्रकाश मोहिते (रा.मानाजीनगर, नहेंगांव, पुणे-) यांच्या ट्रान्सपोर्टचा सुपरवायझर  राजकुमार राठोड टाटा कंपनीचा (ट्रक क्र. एम एच 12 एफ सी 8909) व त्यावर लोड केलेले गुडेंग कंपनीचे 32 टन एच एच डी डी मशीन असे 6 लाखाचे साहित्य मुंबई हून नागपुर येथे  जात असताना  नगर-औरंगाबाद रोड, केडगाव बायपास ,नगर येथे एच डी बी फायनान्सचे मॅनेजर विक्रम सिंग यांचे सांगणेवरुन दिनेश डेमला व त्याचें सोबत असणारे त्यांचे टिम मधील इतर चार ते पाच लोकांनी त्यांचा ट्रकआतील साहित्यासह पकडुन एक्स झोन पार्किंग यार्ड, नगर-पुणे रोड, केडगाव बायपास,नगर येथील यार्डमध्ये नेऊन लावला. 

त्यांना आतील  साहित्या बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.  एच डी बौ फायनान्सचे मॅनेजर विक्रम सिंग आणि  दिनेश डेमला ,सुनिल गोंडाळ यांनी 6 लाख 5 हजार रुपये किमतीच्या साहित्याची अफरातफर करुन फसवणूक केली. या प्रकरणी सागर मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली.पुढील तपास पोलिस हवालदार औटी हे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post