आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची रेमडेसिव्हिर घोटाळ्यात चौकशी


। मुंबई । दि.20 डिसेंबर 2023 । कोरोना काळात झालेल्या कथित गैरव्यवहाराची मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशील पारेख यांचाही समावेश आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या खरेदीत त्यांची चौकशी केली जात असल्याने ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

👉कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण ....

कोरोना काळातील ५.९६ कोटी रूपयांच्या रेमडेसिव्हिर खरेदी प्रकरणात पारेख यांची चौकशी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सरकार ठाकरे परिवाराला घेरत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पारेख यांची तब्बल सात तास चौकशी केली. त्या वेळी त्यांना त्यांना रेमडेसिव्हिर खरेदीबाबत प्रश्न विचारण्यात आले. 

👉धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले 

कोरोना काळात ठाकरे यांच्या सामाजिक कार्याच्या टीममध्ये पारेख यांचा सहभाग असल्याची माहिती हाती आली आहे. मायलॅन कंपनीच्या ठेक्याची महापौर बंगल्यावर चर्चा होत असताना पारेख  तिथे उपस्थित होते.

👉फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केली 6 लाखाच्या साहित्याची अफरातफर

पारेख यांच्या तिथल्या उपस्थितीचा, कंपनीचा आणि रेमडेसिव्हिर खरेदीचा काय संबंध आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांना या ठेक्याचा काही लाभ झाला का ? त्यांच्या सल्ल्यानुसार या कंपनीची इंजेक्शन खरेदी केली का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

👉खा. सुळे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित 

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी जादा दराने झाल्याचा आरोप आहे. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याची  काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या जबाबाच्या आधारे रेमडेसिव्हीर कंत्राटाबाबत पारेख यांची चौकशी करण्यात आली.

👉सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : अजित पवार 

Post a Comment

Previous Post Next Post