गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव, 25 जणांचा मृत्यू
। पणजी । दि.08 डिसेंबर 2025 । गोव्यातील प्रसिद्ध नाईट क्लब, बिर्च बाय रोमियो लेन येथे मोठी दुर्घटना घडली. शनिवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. काही क्षणातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
त्यातील काही लोकच बचावू शकले. आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये बहुतेक क्लब कर्मचारी होते. या दुर्देवी घटनेत 20 जणांचा मृत्यू गुदमरून झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार नाईट क्लब सुरक्षा नियमांचे पालन करत होता. गेल्या वर्षीच हा नाईट क्लब सुरू झाला होता. त्यांनी क्लबच्या जबाबदार व्यवस्थापनावर आणि परवानगी देणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Tags:
Breaking
