। जालना । दि.22 डिसेंबर 2023 । मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचे शिष्टमंडळाने यापूर्वी दिलेले आश्वासन सरकारच्या गळ्यातील अडकलेल्या हाडासारखे झाले आहे. सरसकटला मनोज जरांगे यांनी सोयरे असा पर्याय दिला आहे. या सगेसोयऱ्यांनी आता सरकारची कोंडी केली आहे.
👉तळेगाव दिघेत एटीएम फोडून पावणेपाच लाख पळवले
मराठा आरक्षणाचा निर्णय मुंबईत विधिमंडळाचे खास अधिवेशन घेऊन त्यात निकाली काढण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले; परंतु सरकारने पूर्वी केलेल्या वायद्याप्रमाणे २४ डिसेंबरपूर्वी निर्णय घ्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांची सध्याची घोषणा २४ डिसेंबरच्या आश्वासनाचा भंग आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बीडच्या सभेत रणनीती जाहीर करण्यात येणार आहे. गिरीश महाजन, उदय सामंत व संदीपान भुमरे या तीन मंत्र्यांनी भेट घेऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही.
👉आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची रेमडेसिव्हिर घोटाळ्यात चौकशी
महाजन यांनी सरसकट आरक्षण देता येणार नाही, हे स्पष्ट केले. जरांगे पाटील यांनी २४ तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम राहू नये, अशी विनंती त्यांनी केली. काही ठिकाणी सरकारी अधिकारी जाणीवपूर्वक कुणब्यांच्या नोंदी करीत नसल्याची तक्रार जरांगे पाटील यांनी केली. त्यावर जाणीवपूर्वक नोंदी मिळत नसतील तर मार्ग काढू. २३ नंतर पुन्हा चर्चा करू, असे महाजन यांनी सांगितले.
👉खंडाळा गावातील बांधवांचा मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा
आंतरवालीपासून जवळच असलेल्या वडीगोद्री येथे गेल्या १७ दिपवसांपासून ‘आरक्षण बचाव’च्या मागणीसाठी उपोषण करीत असलेल्या कार्यकर्त्यांची मंत्र्यांनी भेट दिली. ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
👉केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी : मराठा महासंघाची मागणी
