तळेगाव दिघेत एटीएम फोडून पावणेपाच लाख पळवले


। अहमदनगर । दि.21 डिसेंबर 2023 । संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिधे येथील श्रीराम मंदिर पाठीमागे असलेल्या इंडियन ओवरसीज बँक, शाखेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल 4 लाख 86 हजार लंपास केले. काल मंगळवारी (दि.19) रात्री 1.30 ते 2 च्या सुमारास एटीएम फोडण्याची ही घटना घडली.

👉आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची रेमडेसिव्हिर घोटाळ्यात चौकशी

रक्कम पळवल्यानंतर चोरट्यांनी मशीन जाळून टाकले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे तिसर्‍यांदा चोरट्यांनी या ठिकाणचे एटीएम टार्गेट केले आहे. तळेगाव दिघे येथे असलेल्या इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखे नजीकच्या गाळ्यात एटीएम असून मंगळवारी रात्रीच्या सुमरास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यातून तब्बल 4 लाख 86 हजार रुपये चोरट्यांनी पळवले आहे. 

👉धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले

दरम्यान, माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, पो.उपनिरीक्षक इस्माईल शेख यांच्यासह पोलिस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ञ पथकालाही पाचारन करुण तपास सुरु करण्यात आला आहे. याप्रकरणी इंडियन ओवरसीज बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश शिवाजी घुले यांनी फिर्याद दिली आहे. 

👉खा. सुळे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित 

Post a Comment

Previous Post Next Post