। नागपूर । दि.09 डिसेंबर 2025 । राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांमध्ये तर बिबटे थेट वस्तीपर्यंत शिरत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक परिणामग्रस्त क्षेत्रांमध्ये जुन्नर तालुका, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सोलापूर, मराठवाडा तसेच नागपूरचा परिसर आहे. या हल्ल्यांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून, विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना चिंताजनक स्वरूप धारण करत आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा संदेश देत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. ते बिबट्याचा वेष घालून विधानसभेत दाखल झाले.
राज्यातील ग्रामीण भागात, विशेषतः जुन्नर आणि शिरूर परिसरात वाढत चाललेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सरकार कोणत्या ठोस उपाययोजना राबवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी एक आगळा वेगळा प्रकार पाहायला मिळाला. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट बिबट्याच्या वेशात विधानभवन परिसरात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर काहींनी हल्ल्यात जीव गमावला. त्यामुळे राज्य सरकारकडून बिबट्याचा हालचालीवर आणि यावर उपाय योजना सुचवावी अशी विनंती नागरिक करत आहे
