शेवगावात सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड
। अहमदनगर । दि.23 डिसेंबर 2023 । शेवगाव येथील प्रवाशाची सोन्याची चैन चोरणारे दोन आरोपी गजाआड करण्यात आले असून, त्यांच्याकडून 55 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
👉स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्या हाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
या बाबतची माहिती अशी की नंदकुमार दामोधर साबळे (रा.भगुर,ता. शेवगांव ) हे दि.22 नोव्हेंबर रोजी स्टेट बँक शेवगाव या ठिकाणी व भाजीबाजार शेवगाव या ठिकाणी जाऊन घरी जात असताना त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरुन नेली. याबाबत शेवगांव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
👉सोयऱ्यांमुळे सरकारची झाली अडचण
जिल्ह्यामध्ये पाकीटमारीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि आहेर यांना सदर गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, पोहेकॉ बापूसाहेब फोलाने, पोहेकॉ संतोष लोढे, पोना रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून रवाना केले होते.
👉तळेगाव दिघेत एटीएम फोडून पावणेपाच लाख पळवले
शेवगाव परिसरामध्ये सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून आरोपींची माहिती काढताना सदरचा गुन्हा हा मुद्दसर सादीक सय्यद व रंगनाथ गायकवाड (दोन्ही रा. पाथर्डी) यांनी केला असून, ते पुन्हा चोरी करण्यासाठी पाथर्डी जुने बसस्टँड येथे आले आहेत, अशी माहिती मिळाली. पोलीस पथकाने पाथर्डी जुने बस स्टँड या ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.
👉धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले
सदर आरोपींची झडती घेता अंगझडतीमध्ये 55 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मिळून आली. सदर चैनबाबत त्यांचेकडे विचारपूस करता त्यांनी सदरची चैन शेवगाव या ठिकाणावरुन चोरुन आणल्याची कबुली दिली. पुढील तपासकामी शेवगाव पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले आहे.
