शिवाई बस-कंटनेरच्या अपघातात 8 प्रवासी जखमी


। अहिल्यानगर । दि.09 डिसेंबर 2025 । केडगाव उपनगरातील अंबिका बसस्टॉपजवळ शिवाई बस आणि कंटनेरचा अपघात झाला. या अपघातात बसमधील आठ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात रविवारी (दि.7) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला.

भरधाव वेगात शिवाई बस गाडी पुण्याहून नगरच्या दिशेने येत होती. त्यावेळी केडगाव अंबिका बसस्टॉपजवळ हा अपघात झाला. अंबिका बसस्टॉपजवळ शिवाई बस ओव्हरटेक करीत असताना समोरून चाललेल्या भरधाव वेगातील कंटनेरला जोराची धडक बसली. हा अपघात इतका जोरात होता की, शिवाई बसच्या चालकासाईडच्या बाजुच्या मोठे नुकसान झालेे. 

तसेच बसची समोरील काच तुटली. या अपघातात बसमधील 8 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाईबस भरधाव वेगाने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला आहे अपघातात बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. 

यापैकी दोन जणांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर केडगाव परिसरात रस्त्यावर मोठ्या वाहनांची गर्दी झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post