राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने फुटबॉलपटू संग्राम गीते याचा सत्कार

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने फुटबॉलपटू संग्राम गीते याचा सत्कार


। अहमदनगर । दि. 13 जानेवारी 2023 । विनायक राज प्रतिष्ठान आयोजित 15 वर्षाखालील हिवाळी फुटबॉल चषक 2023 स्पर्धेत फ्रेंड्स फुटबॉल क्लबकडून खेळणारा कु.संग्राम धर्मेंद्र गीते याने बेस्ट डिफेंडर व रनर उप खेळाडू म्हणून तसेच त्यांच्या संघाने उपविजेता चषक पटकविल्याबद्दल राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

👉केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी : मराठा महासंघाची मागणी

 यावेळी बोलताना राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले की, हिवाळी स्पर्धेत अनेक संघांनी भाग घेतला होता. संग्राम गीते याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यश प्राप्त केले आहे.  यापुढे सरावात सातत्य ठेवून अधिक परिश्रम घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घ्यावी अश्या शुभेच्छा देवून त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

👉 मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज

प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी अनेक विविध उपक्रम सातत्याने राबवत आहोत त्यामध्ये युवकांना प्रोत्साहन देणे, बेरोजगारांना रोजगार देणे,एकल महिलांना शिलाई मशीनचे वाटप करणे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अन्नदान व शैक्षणिक साहित्याचे वाटप असे अनेक समाजपयोगी उपक्रम नेहमीच राबविले जातात.

👉कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे ! ; पाच जणांवर गुन्हे दाखल

 याप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व दामोदर बिर्याणी हाऊसचे संचालक राजेंद्र ससे,  सचिव दत्ताभाऊ साठे, अ‍ॅड. चेतन रोहकले, रामदास वाघ, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मिलिंद जपे, नक्षत्र बुक डेपोचे संचालक शशिकांत भांबरे,  विशाल कर्डीले, वैभव शिंदे, उदय अनभुले, सतिश इंगळे तसेच प्रतिष्ठानचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.

👉लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक 'एसीबी'च्या जाळ्यात 

Post a Comment

Previous Post Next Post