केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी : मराठा महासंघाची मागणी
मराठा आरक्षणाचा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार
। अहमदनगर । दि. 12 जानेवारी 2023 । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा असून, त्यांच्या मागणीनुसार आरक्षण मिळत नसेल तर, केंद्र शासनाने घटना दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी व मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ ही भूमिका घेऊन पुढे जाणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
👉मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज
तसेच महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपन्या व आस्थापनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची चळवळ सुरु करुन यासंदर्भात सरकारकडे शासन निर्णय काढण्याची मागणी देखील केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
👉देशाबरोबरच महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
पुढे दिलीपदादा जगताप म्हणाले की, जरांगे यांच्या मागणीनुसार पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण दिले तर चांगलीच बाब आहे. मात्र राज्याला असलेले अधिकार पाहता केंद्र सरकारने पंन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसीतून स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्यावे, मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका पार पाडतोय, ओबीसी नेत्याांनी दोन समाजात वाद होईल अशी वक्तव्य करु नयेत.
👉सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे 4 डिसेंबरला अनावरण
अखिल भारतीय मराठा महासंघाची राज्य कार्यकारणी बैठक शहराच्या हॉटेल सुवर्णम प्राईडमध्ये पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, कोषाध्यक्ष श्रीरंग बर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, युवक अध्यक्ष रणजीत जगताप, राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ, जयश्री साळुंखे, मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर काकडे, युवक प्रदेश उपाध्यक्ष परशुराम कासुळे, जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे, एन.बी. धुमाळ, राज गवांदे, रावसाहेब मरकड, पै. नाना डोंगरे, गंगाधर बोरुडे आदींसह राज्य व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.