नगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार : केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन

अहमदनगर जिल्ह्यातील काद्यांला रास्त भाव मिळणार

नगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र  लवकरच सुरु होणार : केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन

खासदार सदाशिवराव लोखंडे यांची माहिती


। नवी दिल्ली  । दि. 13 जानेवारी 2023 । नाशिक , संभाजी नगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला  बाजार भाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर (शिर्डी) येथे लाल कांदा खरेदी केंद्र  त्वरित  सुरु करण्याचे आदेश केद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी संबंधीतांना  दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी आज दिली.

👉विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 


लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. लोखडे यांनी गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली.

👉 गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या दागिन्यांची चोरी 

नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या 24.03 रुपये  प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र अहमदनगर (शिर्डी) येथे याच काद्याचे 20.75 प्रैसे  प्रतिकिलो आहे, ही तीन रुपयांची नुकसान भरुन काढण्याकरीता केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधीतांना तसे आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही रु. 24.03  प्रति किलो प्रमाणे शासनाने  कांदा  खरेदी करण्याबाबतची विनंती केली.  

👉केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी : मराठा महासंघाची मागणी

दुसरी महत्वाची मागणी  अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र  त्वरित सुरु करण्याची मागणी  व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी  हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करावी ही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि  एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.  

👉शाळा महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण, अवैध धंद्यावर कारवाई 

Post a Comment

Previous Post Next Post