कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे!
पाच जणांवर गुन्हे दाखल
तोफखाना पोलिसांची धडक कारवाई
। अहमदनगर । दि.09 डिसेंबर 2023 । उपनगरीय भागात गाळ्यामध्ये प्लायवुडचे कंम्पार्टमेंटला पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या पाच कॅफे शॉपवर तोफखाना पोलिसांनी केली कारवाई केली. या कारवाईने कॅफे चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
नगरच्या उज्वल भविष्यासाठी काम करत राहू : खा. सुजय विखे पाटील
कॅफे स्टेला, कोहीनुर ऑर्केड बिल्डींगचे चालक फरहाण सरफराज शेख ( वय-28 वर्ष, रा.दौंण्ड रोड, हॉटेल शितलमागे, केडगाव, ता.जि.अहमदनगर), डाऊन कॅफे, बालिकाश्रम रोडचे चालक शक्ती मनोहर सिंग (वय 21 वर्षेरा.भिमा सिकर, भिमा , राज्य राजस्थान), हंगरेला कॅफे चालक विशाल भाऊसाहेब पालवे (वय 24 वर्षे रा. कोल्हार, ता. पाथर्डी, जि अहमदनगर), प्रेमदान चौकतील तारापान शेजारी द व्हेनी कॅफे चालक रंजीत जवाहर पंडित (वय 20 वर्षे मुळ रा.इंदिरानगर एफ 44, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन जवळ, पंचशील हॉटेल पुणे), वन स्टार कॅफे येथे कॉफी शॉप चालक ओंकार कैलास ताठे (वय 23 वर्षे रा. ताठे नगर, सावेडी ता नगर, जि.अहमदनगर) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात आणखी दोन एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
कॅफेमध्ये कॅफे शॉपमध्ये कॉफी शॉप बोर्ड लावून कुठलाही कॉफी हा पेय तसेच इतर कुठलेही खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवून त्यास बाहेरुन पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवुन मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिवपदी गोवर्धन पांडुळे
त्यानुसार कोहिनूर ऑर्केड बिल्डींगमध्ये बेसमेंटमध्ये असलेले कॅफे स्टेला, बालिकाश्रम रोड येथे डाऊन कॅफे, पारिजात चौक, गुलमोहर रोड, येथे हंगरेला कॅफे, प्रेमदान चौक, तारापान शेजारी द व्हेनी कॅफे, पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर, येथे वन स्टार कॅफे अशा विविध ठिकाणी तात्काळ छापा टाकला. सदर ठिकाणी कॅफेमध्ये प्लाऊड, बोर्ड, पार्टीकलने वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले दिसले. त्यात काही मुले व मुली या अश्लिल चाळे करताना दिसले. तसेच सदर कॅफेची पाहणी केली असता 3 बाय 3 लांबी रुंदीचे प्लायऊडचे व सुमारे 5 फुट उंचीचे विविध कप्पे व त्यास बाहेरच्या बाजुने पडदे बसविलेले आढळून आले.
पोलिस भरती प्रक्रिया लवकर सुरु करा : कळमकर
आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोपे ठेवलेले दिसून आले. कॉफीशॉपमध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना दिसून आला नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साधने कुठेच नव्हती. सदर ठिकाणी अश्लील चाळे करण्यासाठी आडोशासाठी बनविलेले पडदे तात्काळ काढुन टाकण्यात आले व तेथे मिळुन आलेल्या मुलामुलींना तोंडी समज देवून सोडण्यात आले आहे.
मार्केटयार्ड मागील गोडाऊन फोडून 57 हजाराच्या साहित्याची चोरी
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि मधुकर साळवे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, पो.ना.अविनाश वाकचौरे, संदिप धामणे, वसिम पठाण, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुरज वाबळे, पो.कॉ.सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, शिरीष तरटे, सतिष भवर, यांनी केली आहे.
सारथी’मार्फत नेट, सेट परीक्षेचे दिले जाते मोफत प्रशिक्षण
.. तर पाल्यांवर कठोर कारवाई : पोनि साळवे
क्लासेसला जाणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत, ते बाहेर काही टवाळखोरी करतात काय ? या बाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनुक करणारे आढळुन आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोनि मधुकर साळवे यांनी दिला आहे.
