कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी चोरी करणारे जेरबंद

कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी चोरी करणारे जेरबंद


। अहमदनगर । दि.27 डिसेंबर 2023 ।  कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील दोघे आरोपी 5 लाख 6 हजार 250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जरेबंद केले आहे.

👉जुगार अड्ड्यावर छापा; पाच अटकेत

मिळालेली माहिती अशी की, दि. 25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे (वय 35 वर्षे, रा. पिंपळगांव कौडा, ता. जि. अहमदनगर) हे त्याचेकडील हुंदाई कंपनीची ऑरा गाडी क्रमांक एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 मधुन सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली असता त्यांनी रात्रीचा वेळ असल्याने प्रवाशांना गाडीमधे बसवुन घेवुन जात असतांना रस्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन फियादीस जखम केले व त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला.

👉पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : अजित पवार

 सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक यांनी राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर, यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. 

👉स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभेच्या मैदानात

यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ अतुल लोटके, पोना रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पोकॉ रणजीत जाधव, रविंद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, प्रशांत राठोड अशा पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक नेमुण आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथके तात्काळ रवाना केली. 

👉पुणे, ठाण्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट

विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीची भेट घेवुन फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा व गुन्ह्यातील चोरी गेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही कोपरगांव गांवचे दिशेने गेली असल्याचे दिसुन आले. पथक कोपरगांव परिसरामध्ये कारचा शोध घेत असतांना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. 

👉कलावंतांना संधी द्या : आरती काळे नगरकर

पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे शिवम मातादीन गौतम (वय - 20 वर्षे, रा. बिनपुर, ता. पाटीयाली, जि. करजगंज, उत्तरप्रदेश हल्ली रा. मिंडा कंपनीजवळ सुपा ता. पारनेर) दुर्जन अनारसिंग गौतम (वय 23 वर्षे, रा. नगलारगी, ता. पाटीयाली, जि. करजगंज, उत्तरप्रदेश हल्ली रा. मिंडा कंपनीजवळ सुपा ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले. 

👉मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर

तपासाच्या दरम्यान आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5 लाख 6 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. 

👉प्रवाशांची सोन्याची चेन चोरणारे दोन चोरटे मुद्देमालासह अटक

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामिण विभागाचे संपत भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post