। कोल्हापूर । दि.25 डिसेंबर 2023 । महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेण्याचे ठरवले असले, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र लोकसभेची निवडणूक स्वबळावल लढवणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी तसे जाहीर केले आहे.
👉पुणे, ठाण्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट
स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा देताना महायुती आणि महाआघाडीचा अनुभव वाईट असल्याचे सांगितले. लोकसभेच्या जागावाटप चर्चेमध्ये आम्हाला फारसा रस नाही, असे सांगून, त्यांनी सहा जागांवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. मतांची ही फूट भाजपच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.
👉शतक महोत्सवी नाट्य संमेलनात लोक कलावंतांना संधी द्या
हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलडाणा, परभणी या सहा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. महाविकास आघाडीचे सरकार असतानाच स्वाभिमानी बाहेर पडली. त्यानंतर आणि आताही आण्ही का बाहेर पडलो, याची विचारणा कोणीच केली नाही. महाविकास आघाडीच्या धोरणावर आक्षेप ठेवून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीने त्याववर काहीच स्पष्टीकरण दिले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
👉स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्या हाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
