मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर
20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण
। बीड । दि.24 डिसेंबर । मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होतांना दिसून येत असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला 24 डिसेंबरचा अल्टीमेट संपण्याआधीच जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली असून, 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बीडच्या सभेत दिला आहे.
👉सोयऱ्यांमुळे सरकारची झाली अडचण
त्यामुळे मनोज जरांगे विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळू शकतो. यावेळी उपस्थित सभेला संबोधित करतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा जात संपविण्याचा डाव सरकारकडून केला जात आहे. पण घाबरु नका, मराठा मागे लागला तर दोन पिढ्या तुम्हाला काहीच सुधारणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
👉बाराबाभळी, केतकी, शहापूर, पोखर्डी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा
तर कोणी दंगा करायला लागला तर तो आपला नाही, जो हिंसा करेन तो आपला नाही, एवढे मात्र नक्की आहे. ’प्रश्न मार्गी लावा, नाटक कशाला असे म्हणत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
👉खंडाळा गावातील बांधवांचा मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा
राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
👉मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज
