। ठाणे । दि.25 डिसेंबर 2023 । केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात पहिला रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला. आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुण्या-ठाण्यात दस्तक दिली आहे.
👉मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर
चीन, सिंगापूर, भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. कोरोनाच्या जेएन १ या व्हेरिएंटमुळे चिंता निर्माण झाली आहे. या व्हेरिएंटमुळे चव आणि वास कळत नाही. या नव्या प्रकाराचे ठाणे शहरात पाच तर पुणे शहरात तीन रुग्ण आढळले आहेत. नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दहा झाली आहे. त्यातील निम्मे रुग्ण ठाण्यातील आहेत. ठाण्यात जेएन १ ची बाधा झालेल्यांत एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
👉स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्या हाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
नवीन रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ठाण्यात कोरोनाचे एकूण २८ रुग्ण आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे पुणे शहरात दोन तर पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे. पुणे शहरात कोरोनाची बाधा झालेला रुग्ण अमेरिकेतून आला होता. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या दहापैकी आठ जणांनी लस घेतली आहे.
