जुगार अड्ड्यावर छापा; पाच अटकेत

जुगार अड्ड्यावर छापा; पाच अटकेत

। दीड लाखांचा मुद्देमाल जप्त । एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

। अहमदनगर । दि.26 डिसेंबर 2023 । एमआयडीसी परीसरात तिरट नावाचा जुगार खेळणार्‍या इसमांवर कारवाई करत 1 लाख 41 हजार 210 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

👉पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : अजित पवार

हरीभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे (वय 31 वर्ष रा. भुसणी, ता. औसा, जि. लातूर), अमोल महादेव चौधरी वय 21 वर्षे, रा. नागापूर, ता. जि. अहमदनगर), जुबेर शौकत पठाण (वय 24 वर्षे, रा. नागापूर, ता.
जि. अहमदनगर), सुनील चंद्रकांत रणदिवे (वय 32 वर्षे, रा. नागापूर ता. जि. अहमदनगर), विशाल विष्णू शिंदे (वय 28 वर्षे, रा.नागापूर, ता. जि. अहमदनगर) असे कारवाई झालेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

👉स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभेच्या मैदानात

एमआयडीसीमधील सनफार्मा चौक ते निंबळक जाणारे रोडवर शेळके पेट्रोेलपंपापासून थोड्या अंतरावर शनैश्वर पान स्टॉलचे शेजारी काही इमस तिरट नावाचा जुगार खेळत आहेत, आता गेल्यास मिळून येतील अशी माहिती सपोनि सानप यांना मिळाली. त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर ठिकाणी जात खात्री करण्यास सांगितले. तेथे काही इसम गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आले.

👉पुणे, ठाण्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 1 लाख 41 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल व तिरट खेळाचे साहित्य मिळून आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु रजि. नंबर 1182/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉मराठा आंदोलन आता आझाद मैदानावर

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप, पोसई योगेश चाहेर, पोहेकाँ साबीर शेख, पोहेकॉ देशमुख, पोहेकॉ शिंदे, पोकाँ किशोर जाधव, पोकाँ धुमाळ यांच्या पथकाने केली आहे.

👉तळेगाव दिघेत एटीएम फोडून पावणेपाच लाख पळवले 

Post a Comment

Previous Post Next Post