। नवी दिल्लीः । दि.19 डिसेंबर 2023 । संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे मंगळवारी आणखी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे.
👉बाराबाभळी, केतकी, शहापूर, पोखर्डी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा
निलंबित खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
👉ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनचा बेमुदत ‘देशव्यापी संप‘
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "सभागृहात फलक न आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर निराश होऊन ते असे पाऊल उचलत आहेत. त्यामुळेच आम्ही खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आणत आहोत." यापूर्वी सोमवारी लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांसह ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.
