कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 ची काटेकोर अंमलबजावणी करा

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 ची काटेकोर अंमलबजावणी करा

10 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी संख्या असलेल्या आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती गठित करावी


। अहमदनगर । दि.20 डिसेंबर 2023 । कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई, आणि निवारण) अधिनियम 2013 व 9 डिसेंबर, 2013  च्या नियम अधिनियमातील तरतूदीनुसार ज्या आस्थापनेमध्ये १० किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक नियोक्त्याने आपल्या आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी स्थानिक तक्रारी समिती, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

👉धुमस्टाईने महिलेचे दागिने पळविले

शासकीय,  निमशासकीय, खाजगी क्षेत्र, इंन्टरप्रायजेस, सहकारी संस्था, क्रीडा संकुले, प्रेक्षकगृह, मॉल्स, अशासकीय संघटना, ट्रस्ट रुग्णालये, शुश्रूषालये, क्रीडा संस्था, वाणिज्य, शैक्षणिक, औद्योगिक आदी कार्यालयांमध्ये ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी. या समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे नाव, पत्ता ई-मेल आयडी व मोबाईल नंबर तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे सादर करावे. दरमहा बैठका नियमीत होत असल्याबाबतचा अहवालही dwcd.nagar@yahoo.com मेल या ईमेलवर सादर करावा. ज्या कार्यालयामध्ये समिती गठीत केली नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या संबंधीत आस्थापना नियमानुसार कार्यवाहीस व दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

👉फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केली 6 लाखाच्या साहित्याची अफरातफर 

Post a Comment

Previous Post Next Post