। अहमदनगर । दि.15 डिसेंबर 2023 । दारु पिऊन स्वत:च्या व दुसऱ्याच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असताना वेगात मोटारसायकल चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई माळीवाडा बसस्थानक मागील इम्पिरियल चौक येथे केली.
👉राहात्या घरात गळफास घेऊन मंडलाधिकार्याची आत्महत्या
या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस इम्पिरियल चौक, माळीवाडा, येथे नाकाबंदी करत असताना ॲव्हेटर कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एम एच 16 बी ई 7993) वरील चालक मद्य सेवन करुन गाडी चालवित असल्याचा संशय आल्याने पोलीसांनी त्यास इशारा करुन थांबवले असता
👉ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनचा बेमुदत ‘देशव्यापी संप‘
त्याने मद्य सेवन केल्याचा वास आल्याने त्याची सिव्हील हॉस्पीटल येथे वैद्यकीय अधिकारी यांनी अल्कोहोल संदर्भात वैदयकीय तपासणी करुन त्याने मद्यसेवन केले असुन तो मद्यपान सेवनाच्या आम्लाखाली असल्यांचा रिपोर्ट दिला आहे.
👉तपोवन रोड वरील बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस नाईक संदीप साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विश्वास विलास भालेराव, याच्या विरुध्द विरुध्द भारतीय दंड विधान कायदा कलम 336 सह मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.
