। अहमदनगर । दि.14 डिसेंबर 2023 । अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्यावतीने ग्रामिण डाक सेवकांच्या प्रलंबित ( दि.12) पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक यात सहभागी झाले असून, संघटनेच्यावतीने शहरातील जनरल पोस्ट ऑफिससमोर संघटनेची निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले.
👉माथाडी कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष एल.एम.बर्डे, कार्याध्यक्ष एस.बी.लंके, सचिव आनंदराव पवार, खजिनदार एन.के. बीडगर, माजी जिल्हाध्यक्ष गोरख राजगुरू या पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या आंदोलनात किरण कुरुमकर, संजय परभणे, नईम जहागिरदार, भिमराज गिरमकर, गणेश हजारे, गणेश जगताप, अप्पासाहेब डोंगरे,
👉खंडाळा गावातील बांधवांचा मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा
राजेंद्र गवते, अण्णा पाटोळे, विजयकुमार एरंडे, जी.एच. जगताप, सुर्यकांत श्रीमंदीलकर, बापूराव कांबळे, संतोष शिंदे, श्रीकांत ढगे, सय्यद रशीद, कैलास जाधव, अरुण लबडे, शिवाजी ढवळे, दत्तात्रय कोकाटे, रत्नमाला टेके, सय्यद सलीम, अनिल शिंदे, जबाजी कराळे, सिद्धेश्वर घोडके, लक्ष्मण शिंदे, दिलीप उनवणे, जाकीर शेख, विजय बंगाळे, संतोष चंदन, वाल्मिक जाधव आदींसह डाक सेवक सहभागी झाले होते.
👉राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने फुटबॉलपटू संग्राम गीते याचा सत्कार
ग्रामीण डाक सेवकांना 8 तासांचे काम देऊन पेन्शन लागू करावी, डॉ. कमलेश चंद्र कमिटीच्या संपूर्ण शिफारसी लागू कराव्यात. मोबाईल हँडल करण्याची मुभा असावी. जनतेला देण्यात येणारी डाकसेवा सक्षम व सुविधाजनक करण्यासाठी लॅपटॉप, प्रिटर्स आणि ब्रॉडबैंड नेटवर्क सर्व शाखा डाक घरांना पुरविण्यात यावेत. यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
