। अहमदनगर । दि.14 डिसेंबर 2023 । तपोवन रस्त्यावर सुरू असलेल्या बिंगो जुगारावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत बिंगो जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 15 हजार 160 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपोवन रस्त्यावरील महाराष्ट्र बँके शेजारी शुभम शहादेव बडे हा मोबाईलवर आय.डी. व पासवर्ड वापरून बिंगो नावाचा जुगार पैसे घेऊन खेळवित आहे, अशी माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस अंमलदार गवळी, दिनेश मोरे, अविनाश वाकचौरे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता बडे हा बिंगो जुगार खेळविताना मिळून आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुभम शहादेव बडे ( रा. पाइपलाइन रोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:
Ahmednagar
