। अहमदनगर । दि.13 डिसेंबर 2023 । रेल्वे माल धक्क्यावरील सुमारे सहाशे कामगारांचा थकीत वेतन वसुलीसाठी अहमदनगर जिल्हा माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीने 15 डिसेंबरला महसूल विभागाच्या विरोधात भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कामगारांनी काम चालू ठेवले आहे. मात्र, मंगळवार सकाळपासून काळया फिती बांधून माथाडी मंडळ, जिल्हा प्रशासन, महसूल विभागाचा निषेध नोंदवत कामगारांनी आंदोलन सुरू करत आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांमधील वाढणारा संताप, आक्रोश मोर्चा रोखण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनामध्ये कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे.
काँग्रेस माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, महसूल विभाग मूठभर ठेकेदारांना पाठीशी घालत असून शेकडो कामगारांच्या कुटुंबीयांवर यामुळे संकट कोसळले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून घाम गाळून काम करून देखील माथाडी मंडळाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे कामगारांना अद्यापही वेतन मिळालेले नाही. कामगारांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे. म्हणूनच कामगारांनी मोर्चा निघेपर्यंत काम करताना काळया फिती बांधून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पोपट लोंढे, रोहिदास भालेराव, पंडित झेंडे, विलास गुंड, सागर पोळ, भगवान शेंडे, किशोर ढवळे, विजय वैरागर, दिपक काकडे, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, किशोर जपकर, अनील जपकर, अनील कार्ले, संतोष भालेराव, संजय माळवे, कैलास कार्ले, सचिन वाघमारे, प्रशांत लक्ष्मण गायकवाड, कुमार डाके, बाळासाहेब अनारसे, बबन बनसोडे, अमर डाके, अंबादास कोतकर राधेश भालेराव, नितीन भोंदे, सतीश शेंडे, मंगेश एरंडे, संतोष वाघमारे, सचिन लोंढे, अर्जुन जाधव, ईेशर पवार, आतिश शिंदे, निलेश सोनवणे, नानासाहेब महारनवर, हरीभाऊ कोतकर, संदीप कार्ले, दिपक गुंड, ज्ञानदेव कदम, राजेंद्र तरटे, कौतीक शिंदे, संतोष गायकवाड, बबन डांगे, विजय कार्ले, विनोद केदारे, बाबासाहेब हजारे, आकाश ठोसर, नानासाहेब दळवी, संजय देठे आदिल सहज शेकडो कामगार सहभागी झाले होते.
Tags:
Ahmednagar
