राहात्या घरात गळफास घेऊन मंडलाधिकार्‍याची आत्महत्या

। अहमदनगर । दि.14 डिसेंबर 2023 । श्रीगोंदा येथे राहणारे परंतु कर्जत तहसील कार्यालय अंतर्गत माहिजळगाव या ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने राहत्या घराच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

👉तपोवन रोड वरील बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा 

शहरातील शाहूनगर या ठिकाणी वास्तव्य असणारे कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील मंडळ अधिकारी संजय जगताप हे अतिशय मनमिळाऊ सवारशी प्रेमाने वागणारे, प्रामाणिकव्यक्तीमत्व होते. मात्र, 12 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घराच्या छतावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. 

👉माथाडी कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू 

जगताप यांची आत्महत्या होण्याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यांच्या अचानक जाण्याने शोककळा पसरली आहे. सकाळी त्याच्या मूळ गावी लोणी व्यंकनाथ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

👉राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने फुटबॉलपटू संग्राम गीते याचा सत्कार

Post a Comment

Previous Post Next Post