अपहरण करुन रस्तालूट करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद


। अहमदनगर । दि.04 जुलै 2023 ।  अपहरण करून रस्ता लुट करून नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी जबरी चोर्‍या करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी पकडून 2 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शेवगाव तालुक्यातील मालेगाव येथे केली. 

दोन वर्षापासून रखडलेल्या जिल्यातील महसूल कर्मचाऱ्याच्या अखेर बदल्या

या बाबतची माहिती अशी की विशाल विलास खळदकर ( वय 20 वर्ष रा. नेप्ती नाका दातरंगे मळा, अ.नगर ) यांला दि. 30जून रोजी रात्री आठच्या सुमारास अमरधाम जवळून दोन अनोळखी इसमांनी बिना नंबरच्या स्वीप्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण करुन 

शिक्षण हा सुरक्षित भविष्याचा दरवाजा उघडणारा पासवर्ड : न्यायाधीश संगिता भालेराव

त्याला जास्त गडबड करु नकोस नाहीतर तुला मारुन टाकू असा दम देवुन कल्याण बायपास रोडने दौंडकडे आरणगावच्या पुढे नेले. त्यांचे खिशातील मोबाईल फोन व रोख रक्कम जबदस्तीने काढून घेऊन त्यास अरणगाव रोडला सोडून देऊन ते अनोळखी इसम निघून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर -मनमाड,करमाळा व बाह्यवळण महामार्गाचे काम जलद गतीने करा खा.विखे यांच्या सूचना

कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस जवान यांनी तात्काळ गुन्हयाची गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन. आरोपीचा सुरू केला. गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयातील आरोपी हे सध्या शेवगाव जि. अ.नगर येथे आहेत. 

बीआरएस मध्ये महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता : संतोष वाडेकर

त्यावरून मळेगाव ता शेवगाव येथे टीम रवाना झाली. मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्याने नाव सागर नवनाथ निकम, ( रा मळेगाव ता शेवगाव जि अ.नगर सध्या रा. लोंढेनगर कल्याण रोड अ.नगर ) असे सांगितले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

त्याने गुन्हयाची कबुली देऊन गुन्हा करण्यासाठी त्याचे सोबत एक विधी संघर्षीत बालक असल्याची माहिती दिली.त्याच्या ताब्यात तीन मोबाईल हॅण्डसेट व एक स्वीप्ट कार असा 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन हे करत आहे.

बुलढाण्यात भीषण अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू

दुसर्‍या घटनेत सतिश संभाजीराव इखे (वय 42 वर्षे, रा पळसखेड ता.केज जि बीड ) यास 4 दिवसांपूर्वी केडगाव परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटले होते. त्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

ट्रॅक्टर चोरणारा चोरटा जेरबंद ...

दि.29 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास दोन अनोळखी इसमांनी नगरपालिका समोर पोलीस ठाणे अंबाजोगाई जि.बीड येथे खोटे बोलून भाड्याच्या पोटी गाडी घेवून सतिश इखे यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाड़ी ही भाड्याने लावुन घुमटवाडी ता.पाथडी पुढे काही अंतरावर गेल्यानंतर गाडी थांबवण्यास सांगून माझ्या बहिणीस घेवुन येतो असे म्हणून 

अबिका महिला बँकेच्या चेअरमनपदी...

एक इसम गाडीच्या खाली उतरला. गाडीत बसलेल्या इसमाने सतीष इखे याच्या डोळ्यात चटणी टाकून गाडीतील खाली उतरलेल्या अनोळखी इसमाने गाडीतून खाली ओढुन धक्काबुक्की करून इखे याच्या खिश्यातील रोख रक्कम, व्हिवो कंपनीचा मोबाईल व स्विफ्ट गाडी हिसकावून घेवून गेले त्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 

स्कॉर्पीओतून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले

केडगाव आणि पाथर्डी येथील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिली. चोरलेली स्विफ्ट गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकारांमध्ये आणखी एक आरोपी निष्पन्न होत असून त्याचा ही शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर : मुख्यमंत्री

उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उप निरीक्षक महाजन व पोलिस नाईक शाहिद शेख, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, यांनी तसेच सायबर सेलचे पोलिस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post