कार्याध्यक्ष मोहन देशमुख, जनरल सेक्रेटरी अॅड.सुधीर टोकेकर
नगर, (दि.15 जुलै) : पतसंस्था कर्मचारी संघटनेचे वार्षिक सभा नुकतीच मोजक्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत व ऑनलाईन सदस्यांच्या सहभागाने संपन्न झाले. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेच्या कार्य वाढविण्याचे व शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत पुढील दिशा ठरविण्यात आली. तसेच यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ती पुढील प्रमाणे
अध्यक्ष - समिर खडके (नगर), कार्याध्यक्ष - मोहन देशमुख(संगमनेर), उपाध्यक्ष -उमेश गडदे (श्रीगोंदा), दत्तात्रय गायखे (पारनेर), पांडूरंग नवले (अकोले), जनरल सेक्रेटरी - अॅड.सुधीर टोकेकर (नगर), सहसेक्रेटरी - किसन वर्हाडे (श्रीगोंदा), बापूसाहेब रांधवणे (कोपरगांव), खजिनदार - शंकर मिसाळ (नगर), कार्यकारिणी सदस्य - बिजू सदाफुले (जामखेड), कारभारी फाटक (राहुरी), तुषार दारके (पाथर्डी), राहुल आवारी (अकोले), पंकज पुरोहित (कर्जत), चंद्रकांत मगरे (श्रीरामपूर), भास्कर डांगे (राहाता) आदिंची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष समीर खडके म्हणाले, पतसंस्था कर्मचार्यांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु संघटनेच्या माध्यमातून त्यातील अनेक प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन मार्गी लावले आहेत. त्यातील सेवानियम लागू करण्याबाबतचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे, अजूनही काही कर्मचार्यांना सेवानियम लागू झालेला नाही, त्यासाठी पुन्हा उपनिबंधकांना निवेदन देण्यात येईल. तसेच शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या योजना पतसंस्था कर्मचार्यांना लागू होण्यासाठी संघटनेच्यावतीने लढा दिला जाईल. नूतन पदाधिकार्यांना बरोबर घेऊन संघटनेचे काम आपण वाढवणार असल्याचे निवडीनंतर सांगितले.
याप्रसंगी जनरल सेक्रेटरी अॅड. सुधीर टोकेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व इतर विषय चर्चेला घेऊन सर्व विषय मंजूर केले. तसेच यावेळी उपस्थित ऑनलाईन सदस्यांनी विविध सूचना मांडल्या त्या विषयी चर्चा होऊन खेळीमेळीत ही सभा संपन्न झाली.

Tags:
Ahmednagar