अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राजभवनात शपथविधी संपन्न; राज्यपाल रमेश बैस यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ

 

। मुंबई । दि.02 जुलै 2023 । विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

बुलढाण्यात भीषण अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये  छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील,  हसन मियालाल मुश्रीफ,  धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

ट्रॅक्टर चोरणारा चोरटा जेरबंद : नगर तालुका पोलिसांची कारवाई

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी

Post a Comment

Previous Post Next Post