शिक्षण हा सुरक्षित भविष्याचा दरवाजा उघडणारा पासवर्ड : न्यायाधीश संगिता भालेराव

शिक्षण हा सुरक्षित भविष्याचा दरवाजा उघडणारा पासवर्ड : न्यायाधीश संगिता भालेराव

कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

। अहमदनगर । दि.04 जुलै 2023 । कौटुंबिक न्यायालयाच्या वकील संघाने सामाजिक जाणीवेतून वंचित घटकांना केलेली मदत खूप उपयुक्त आहे. गरजूंना शिक्षणासाठी केलेले मदत कार्य कौतुकास्पद आहे. शिक्षण हा असा पासवर्ड आहे जो आपल्या सुरक्षित भविष्याचे दरवाजा उघडतो. विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे. गेल्या शंभर वर्षापासून हिंद सेवा मंडळ करत असलेले शैक्षणिक कार्य अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन कौटूंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगिता भालेराव यांनी केले.

अहमदनगर -मनमाड,करमाळा व बाह्यवळण महामार्गाचे काम जलद गतीने करा खा.विखे यांच्या सूचना

नगरच्या कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने दादा चौधरी विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कौटूंबिक न्यायालयाच्या नूतन न्यायाधीश संगिता भालेराव व महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे नूतन उपाध्यक्ष अॅड. उदय वारुंजीकर यांच्या प्रमुख उपस्थिती झाले. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीअण्णा कराळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, अजित बोरा,

बीआरएस मध्ये महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता : संतोष वाडेकर 

वकील संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सुरेश लगड, उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, सहसचिव अॅड. अर्चना सेलोत, खजिनदार अॅड. राजेश कावरे, सदस्य अॅड. मच्छिंद्र अंबेकर, अॅड. डॉ. शिवाजी सांगळे, अॅड. सुचिता बाबर, दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई, मुख्याध्यापक मधुकर साबळे आदींसह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरिष मोडक यांच्या वाढदिवसानिमित्त न्यायाधीश संगिता भालेराव यांच्या हस्ते सत्कार करून अभीष्टचिंतन करण्यात आले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्काराने सन्मानीत

अॅड. उदय वारुंजीकर म्हणाले, वकील हा दुसऱ्याला मदत करण्यासाठी काम करत असतो. त्यामुळे सेवा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वकिली पेशा स्वीकारावा. दादा चौधरी शाळे जवळच कोर्ट असल्याने सख्ये शेजारी असलेल्या या शाळेचा व वकिलांचे घनिष्ट संबंध आहेत. आज तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या आहेत. भविष्यात एव्हढे मोठे व्हा की सर्वजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, असा सल्ला विद्यार्थ्यांना देत वकील संघाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

बुलढाण्यात भीषण अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू

प्रा.शिरीष मोडक म्हणाले, हिंद सेवा मंडळाचे ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य गेले १०० वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. प्राथमिक शिक्षण ते एमएससी पर्यतचे उच्च शिक्षण देणारी ही संस्था आहे. चांगले विद्यार्थी घडवण्याची मूस हिंद सेवा मंडळ आहे.

अॅड. अनंत फडणीस म्हणाले यांनी हिंद सेवा मंडळाचा वैभवशाली इतिहास विशद करून सारडा महाविद्यालयात मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत विशेष वर्ग सुरु करत आहोत, असे सांगितले.

अनंत देसाई म्हणाले, दादा चौधरी विद्यालय गेले ८६ वर्षापासून ज्ञानदानाचे काम करत आहे. या आधी केवळ मुलांची असलेल्या या शाळेत या वर्षापासून मुलींनाही प्रवेश दिले आहे. शाळेचा १० वीचा निकाल ९६ टक्के लागला आहे. याचे श्रेय पूर्णपणे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आहे. वकील संघाने विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल आभार.

प्रास्ताविकात अॅड. शिवाजी कराळे म्हणाले, आपण समजाचे देण लागतो या भावनेने जे गरजू आहेत त्यांना मदत करणे आपले कर्त्यव्य आहे. दादा चौधरी विद्यालयात रिमांडहोम, बाबवाडी सारख्या संस्थांचे सुविधांपासून वंचित असलेले विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहे. त्यांच्यासाठी सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबवला आहे. गरिबी कधीही शिक्षणाच्या आड येत नाही आलीतर श्रीमंतीच आड येते हे अनेकांनी सिद्ध केले आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

Post a Comment

Previous Post Next Post