बीआरएस मध्ये महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता : संतोष वाडेकर

।  पारनेर । दि.03 जुलै 2023 । भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचा कायापालट करण्याची क्षमता आहे असे प्रतिपादन पक्षाचे पारनेर तालुका समन्वयक संतोष वाडेकर यांनी केले. पारनेर तालुक्यातील जवळे येथे भारत राष्ट्र समितीच्या संपर्क अभियान व नोंदणी रथाचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तेलंगणा राज्याच्या विकास मॉडेलची सध्या देशभर चर्चा चालु आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची...

शेती विषयक प्रश्नांचा प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाने विकासाचा अजेंडा म्हणून घोषीत केले आहे. तेलंगणा राज्‍य अल्पावधीतच विकास मॉडेल म्हणून पुढे आले आहे. बीआरएस हा पक्ष भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढणार आहे . त्या पार्श्वभूमीवर पक्षाची विचारधारा जनते पर्यंत पोहचवण्यासाठी हि संपर्क मोहिम सुरू आहे असेही ते म्हणाले.

बुलढाण्यात भीषण अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू 

यावेळी जवळे येथील अनेक शेतकऱ्यांनी पक्षात ऑनलाईन पद्धतीने नोंदनी करून सदस्सत्व घेतले. यावेळी बाळासाहेब पातारे, सुभाष करंजुले, अविनाश देशमुख,  अशोक आंधळे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तर संपर्क अभियान रथाचे जोरदार स्वागत जवळे येथील रामदास घावटे , सतिष रासकर , रामदास सालके , अमोल कोठावळे , संभाजीराव सालके , नवनाथ सालके , ओंकार सालके , संतोष सालके , गणपत सालके , रामचंद्र मेसे , रमेश देशमुख ,प्रभाकर घावटे यांनी केले .

 

Post a Comment

Previous Post Next Post