संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवांना फासले काळे

 संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवांना फासले काळे


। मुंबई । महाराष्ट्र राज्याचे लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असल्याचे माहिती समोर आली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली.


राज्य लोकसेवा आयोग (MPSC) भरती परीक्षा पेपरफुटी आणि कारभारातील अनागोंदीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले असताना दुसरीकडे वातावरण आणखीच तापलंं आहे.  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे.


औषधं निरीक्षक पेपरफुटी संदर्भात संभाजी ब्रिगेड ने 3 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले होते. त्याच वेळी सरकारला आम्ही इशारा दिला होता मात्र सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे


त्यांना ज्या भाषेत समजत त्या भाषेत सांगितलं पाहिजे म्हणून ही संभाजी ब्रिगेड ची प्रतिक्रिया असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हंटले आहे. चझडउ चे अध्यक्ष व सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही तर पुढचा नंबर हा (MPSC) अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ताहिक वियजमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post