। अहमदनगर । दि.30 जून 2023 । नगर तालुक्यातील चास गावच्या शिवारात निमगाव
वाघा रोड राहणार्या शेतकर्याचा घरासमोर लावलेला ट्रॅक्टर चोरून नेणार्या चोरट्याला नगर
तालुका पोलिसांच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनी येथे पकडले.
स्कॉर्पीओतून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले
सचिन भास्कर जाधव (रा. निमगाव वाघा, ता.नगर) असे त्याचे नाव असून त्याने भाळवणी
येथे विकलेला चोरीचा ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चोरीप्रकरणी नगर तालुका
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जलजन्य आजाराबाबत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोहेकॉ जगदीश जंबे, सुभाष थोरात, पोना राहुल शिंदे, पोकॉ कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, सोमनाथ वडणे यांचे पथक नेमून त्यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केली होती.
शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ
सदर पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूला चौकशी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर सदर्भात चौकशी केली. हा तपास करीत असताना सपोनि शिशिरकुमार देशमुख
यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेला ट्रॅक्टर सचिन भास्कर जाधव (रा. निमगाव वाघा,ता. नगर) याने चोरलेला आहे व तो सध्या एमआयडीसी येथील चेतना कॉलनी येथे त्याचे अस्तित्व लपवून राहत आहे.
बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारून राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा.....
त्याअनुशंगाने देशमुख यांनी सदर पथकाला त्याला शोधण्यासाठी पाठविले. पथकाने चेतना कॉलनी येथे जावून आरोपीचा शोध घेतला असता तो भाडयाने फ्लॅट घेवून राहत असल्याबाबत समजले. त्यानुसार सदर फ्लॅटमध्ये जावून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने
गुन्ह्याची कबुली देत ट्रॅक्टर भाळवणी (ता. पारनेर) येथे विकला असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन !
