बुलढाण्यात भीषण अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू


। बुलढाणा । दि.01 जुलै 2023 ।   विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर आठ प्रवासी थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रॅक्टर चोरणारा चोरटा जेरबंद : नगर तालुका पोलिसांची कारवाई

नागपूरहून पुण्याला जाणार्‍या विदर्भ एक्स्प्रेसच्या बसला समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 1 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, किंवा ड्रायव्हर सांगतोय, बसचे टायर फुटले. त्यानंतर गाडी पुलाला लागून घसरली, डिझेल टँक फुटून आग लागली.

स्कॉर्पीओतून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले

मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला जाणारी होती. बुलढाण्यातील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. 

जलजन्य आजाराबाबत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. या बसमधील 20 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असून या सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post