अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रा. ह. दरे साहेब यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आणि त्यांचे भविष्य घडविण्यासाठी संस्था अविरत कार्य करत राहील, अशी ग्वाही दिली. संस्थेचे सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना सध्या परिस्थितीमध्ये वाढत असणारी शिक्षणाची गती आणि शिक्षण घेत असताना कोणत्या आवश्यक गोष्टी विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे सहसचिव मा. मुकेश दादा मुळे साहेब, खजिनदार ॲड. दीप लक्ष्मी म्हसे मॅडम, विश्वस्त मा. श्री. जयंतराव वाघ साहेब, मा. राजेश्वरी जगताप, रांजणगाव स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथील डॉ. नितीन घवाटे, व सकाळ वृत्तपत्र समूहाचे यिन जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाय. आर. खर्डे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महाविद्यालयामध्ये मागील वर्षी अमलात आणल्या गेलेले विविध उपक्रम आणि यावर्षी राबविल्या जाणाऱ्या नवनवीन संकल्पना याविषयी अगदी सविस्तर माहिती दिली. उपस्थित पालकांमधून श्री नितीन आव्हाड , सौ. जयश्री शिरोळे, यांनी देखील आपल्या भाषणांमधून प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम क्रमांकाची पसंती या महाविद्यालयाला दिल्याची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अक्षय देखणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले मॅडम यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख कार्यक्रमाप्रसंगी डॉ. एम. के. भोसले (प्रथम वर्ष समन्वयक), डॉ. एस. एम. वाळके (ई अँड टी सी विभाग प्रमुख), प्रा. पी. जी. निकम (सिव्हील विभागप्रमुख), प्रा. ए. बी. काळे (मेकॅनिकल विभागप्रमुख), प्रा. एन . बी. गाडे (कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख), डॉ. व्ही. व्ही. पाटील (ए.आय. विभागप्रमुख), प्रा. बी. एन. खरड (रोबोटिक्स अँड ऑटोमेशन विभाग प्रमुख, प्रा. पी. आर . मुटकुळे (ए आय एम एल विभागप्रमुख) यांच्यासमवेत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे कार्यक्रम झाल्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला व सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच पालकांच्या हस्ते वृक्षारोपण महाविद्यालयाचे परिसरात करण्यात आले.


