। अहमदनगर । दि.04 जुलै 2023 । भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकविण्यासाठी दुसरा पक्ष फोडून अभद्र युती केली. 16 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नैतिकतेच्या गप्पा मारणारे भाजप कोणत्या थराला जाऊ शकतात. हे जनतेने रविवारच्या घडामोडीने पाहिले असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.
अपहरण करुन रस्तालूट करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद
महाराष्ट्र पक्ष फोडाफोडीतून सत्ता टिकवण्याच्या झालेल्या घडामोडींनंतर भाकपच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची ऑनलाईन पध्दतीने बैठक झाली. भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य प्रकाश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव सुभाष लांडे, सहसचिव प्रा.राम बाहेती, तुकाराम भस्मे, नामदेवराव चव्हाण , स्मिता पानसरे, सुकुमार दामले, राजन क्षिरसागर आदी कार्यकारणी सदस्य सहभागी झाले होते.
दोन वर्षापासून रखडलेल्या जिल्यातील महसूल कर्मचाऱ्याच्या अखेर बदल्या
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मंत्री पद देऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची ऐसी तैसी केल्याचा सूर या बैठकीत उमटला. भ्रष्ट आर्थिक घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी ईडीच्या भीतीपोटी भाजपाच्या तंबूत शिरणार्या या आमदारांचा निषेध करुन त्यांना जनतेच्या दरबारात उघडे करण्याचा संकल्प करण्यात आला.
शिक्षण हा सुरक्षित भविष्याचा दरवाजा उघडणारा पासवर्ड : न्यायाधीश संगिता भालेराव
