शिवसेनेकडून चांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार

। अहमदनगर । दि.11 डिसेंबर 2023 । अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाखालून शहरांतर्गत वाहतूक सुरु आहे. परंतु अपुरी पोलीस यंत्रणा व सिग्नलचा अभावामुळे छोट्या छोट्या अपघातांची वाढ होत असल्याने हे अपघात टाळण्यासाठी सिंग्नल यंत्रणा कार्यन्वित करुन वाहतुक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान मागणी करत शिवसेनच्या वतीने बंद सिग्नलला चपलांचा हार घातला आहे.

👉 देशाबरोबरच महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

शिवसेनेने चांदणी चौकातील बंद सिग्नलला चप्पलाचा हार घालत आंदोलन केले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, संतोष गेन्नप्पा, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, स्मिता अष्टेकर, नगरसेवक योगिराज गाडे, जालिंदर वाघ, दादा भोसले, दीपक भोसले आदींसह आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

👉  मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज

भगवान फुलसौंदर म्हणाले कायनेटिक चौक, यश पॅलेस, स्वस्तिक व चांदणी चौक, कोठी चौक, चाणक्य चौक, स्टेट बँक चौक, कोठला स्टॅन्ड, माळीवाडा बस स्टँड, स्वीट होम चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक, नगर कल्याण रोड बायपास चौक, भिस्तबाग, हुंडेकरी, गुलमोहार रोड आदी ठिकाणी सिग्नलची अवस्था असून खोळंबा नसून अडचण अशी झाली आहे.

👉 कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे !

विक्रम राठोड म्हणाले शिवसेना ही नेहमी जनतेच्या प्रश्नांकरता रस्त्यावर उतरते. अनेक ठिकाणी सिग्नल बंद असून प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. उडडाणपुलाखालून वाहतूक जास्त असून सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे असे ते म्हणाले.

भरदिवसा रूमचे कुलूप तोडून लॅपटॉपची चोरी 

संभाजी कदम म्हणाले की, वारंवार निवेदन देऊनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नाही. सातत्याने होणार अपघात, वाहतूक कोंडी थांबायला हवी याकरता हे आंदोलन करत आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post