कांद्याची गोणी अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

। अहमदनगर । दि.11 डिसेंबर 2023 । कांद्याच्या गोण्या वाहनात टाकत असताना कांद्याची गोणी छातीवर पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे गुरुवारी (दि.७) सकाळी घडली. भाऊसाहेब उर्फ नाथा धर्मा गोरे (वय ४५, रा. रुई छत्तीसी, ता.नगर) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

👉शिवसनेकडून चांदणी चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार

 गोरे यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली होती. कांदा गोण्यांमध्ये भरून त्यांनी शेतात ठेवलेला होता. नेप्ती कांदा मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव असल्याने त्यांनी कांदा विक्रीला नेण्यासाठी टेम्पो बोलावला. कांद्याच्या गोण्या उचलून टेम्पोत टाकत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले, त्यांच्या डोक्यावरील कांद्याची गोणी त्यांच्या छातीवर पडून दबले गेले.

👉देशाबरोबरच महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार 

 त्यांचे चुलत भाऊ प्रवीण गोरे व इतरांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, सकाळी डॉक्टरांनी त्यांना औषधोपचारापूर्वीच मयत घोषित केले. या मृत्यूप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज 

Post a Comment

Previous Post Next Post