देशाबरोबरच महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
। नवी दिल्ली । दि.11 डिसेंबर 2023 । देशातील अनेक राज्यांमध्ये पावसानंतर थंडी आणखी वाढणार आहे. येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात उद्यापासून गारपिटीचा इशारा दिला आहे.
कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे ! ; पाच जणांवर गुन्हे दाखल
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमधील तापमानात सातत्याने घट होत आहे. रविवारी राजधानीचे किमान तापमान ८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आज कमाल तापमान २३ अंश तर किमान तापमान ८ अंश राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत प्रदूषणाची समस्या वाढू शकते. दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही खराब श्रेणीत आहे. एवढेच नाही तर येत्या तीन दिवसांत राजधानीतील प्रदूषणाची समस्या आणखी वाढू शकते.
भरदिवसा रूमचे कुलूप तोडून लॅपटॉपची चोरी
काश्मीरमध्ये पारा शून्याच्या खाली पोहोचला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही ठिकाणी, तर आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये पारा उणे ४.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये पारा उणे ४.२ अंश सेल्सिअस नोंदवला गेला.
घरगुती गॅस टाक्यांचा अवैध साठा जप्त : 67 हजाराचा मुद्देमाल जप्त
