भरदिवसा रूमचे कुलूप तोडून लॅपटॉपची चोरी


। अहमदनगर । दि.01 डिसेंबर 2023 । शिक्षण आणि नोकरी निमित्ताने भाडोत्री रूमवर राहणार्‍या युवकांची रूम अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. कपड्यांची उचकापाचक करून 25 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप चोरून नेला आहे. 

लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक 'एसीबी'च्या जाळ्यात

सावेडी उपनगरातील अर्जुन वॉशिंग सेंटर जवळ सोमवारी (दि.20) दुपारी 12 ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी युवराज अशोक अजबे (वय 23) या युवकाने सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

...आणखी दोन एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

फिर्यादी अजबे हे खासगी कंपनीत नोकरी करतात. ते शिक्षण घेणार्‍या इतर दोन मुलांसह भाडोत्री रूम मध्ये राहतात. सोमवारी दुपारी 12 ते तीन वाजेच्या दरम्यान रूमवर कोणी नसताना चोरट्याने रूमचे कुलूप तोडून फिर्यादी अजबे यांचा 25 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला आहे. दुपारी तीनच्या सुारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन

Post a Comment

Previous Post Next Post