समृद्धी डेअरी फार्म चे उल्लेखनीय व्यवस्थापन : मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर
। चिचोंडी पाटील । दि. 14 जानेवारी 2023 । समृद्धी डेअरी फार्म चे व्यवस्थापन उल्लेखनीय असून शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा तसेच शेतकऱ्यांनी पूरक दुग्ध व्यवसायावर भर द्यावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत गाई म्हशींसाठी वंधत्व निवारणासाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथिल बाबासाहेब परकाळे, राजेश परकाळे यांचे समृद्धी डेअरी फार्म येथे वंधत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुनील तुंबारे , जिल्हा परिषद पशू संवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे , पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल गडाख , पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष बंटीभाऊ भिंगारदिवे, उपसरपंच महादजी कोकाटे , चंद्रकांत पवार, देवा मोरे , सिताराम कोकाटे, खंडू ठोंबरे ,बाबा ठोंबरे, नाना कोकाटे ,ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे, प्रशांत कांबळे,खाजगी पशुवैद्यक डॉ. यश पवार , डॉ. विशाल ससे , दिनेश वाडेकर ,अनील भिंगारदिवे,शाम काळदाते, रवी सदाफुले ,आप्पासाहेब सदाफुले, शिवराज परकाळे, संतोष परकाळे, सचिन खेडकर , दानिश सय्यद,मुन्ना सय्यद, शंतनु जाधव आदी उपस्थीत होते.
समृद्धी डेअरी फार्म चे राजेश परकाळे, बाबासाहेब परकाळे यांनी गोठ्यामध्ये राबविण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन बाबत आशिष येरेकर यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी संपूर्ण गोठ्याची पाहणी केली. गोठ्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत कशा पद्धतीने कामकाज चालते याबाबत माहिती जाणून घेतली. गाई म्हशींना देण्यात येणाऱ्या खाद्य बाबत महिती घेतली.
राजेश परकाळे म्हणाले की समृद्धी डेअरी फार्म मध्ये प्रत्येक जनावराचे दैनंदिन खाद्य, गोठ्यातील स्वच्छता तसेच इतर बाबींवर आम्ही विशेष भर देत असून सध्या आमच्याकडे लहानमोठी जवळपास ८० जनावरे आहेत. गोठ्यामध्ये सर्वच बाबींचे उत्तम व्यवस्थापन करण्यात येते त्यामुळे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
बाबासाहेब परकाळे म्हणाले की बऱ्याच वेळा गायी ,म्हशी यांच्या पोटात खाद्यासोबत इतर गोष्टी जसे लोखंड व धातूचे छोटे तुकडे जनावराच्या पोटात जातात यामुळे पोटात इजा होऊन जनावर दगावणे चे प्रमाण वाढले आहे. तरी शासनाने मॅग्नेट उपलब्ध करून द्यावे जेणेकरून धातू पदार्थ लोखंडाचे छोटे तुकडे जनावराच्या पोटात गेले तरी त्यास बाधा होणार नाही. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल गडाख म्हणाले
आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जमिनीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस ची कमतरता आहे. आणि जनावरांना खाद्य मार्फत ते मिळत नाही मग जनावर दगड, लोखंड,तार, खिळा अश्या वस्तू खातात आणि भविष्यामध्ये त्याच्या पोटात जाऊन साठतात. भविष्यात पशुच्या जीवनाला धोका निर्माण करतात . यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही मग्नेट देत आहोत.यावर उपाययोजना करण्याचे काम पशुधन विभाग करत आहे. अशी माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासमोर गाई म्हशींना कोणतीही मशनरी शिवाय कमीत कमी तंत्रज्ञानामध्ये मॅग्नेट
देण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आशिष येरेकर म्हणाले की नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील समृद्धी डेअरी फार्म चे व्यवस्थापन उत्तम असून इतर शेतकऱ्यांनी या गोठ्याचा आदर्श घ्यावा यांच्या कार्यपद्धती प्रमाणे जनावरांचा खाद्य,स्वच्छता ठेवावी. जेणेकरून शेती सोबत पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायावर भर देण्यात येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी व्यक्त केले.याप्रसंगी पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या शंका जाणून घेऊन उपायोजना सुचविल्या. जनावराच्या आरोग्याबाबत सूचना केल्या.
👉नगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार : केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन
👉शाळा महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण, अवैध धंद्यावर कारवाई
👉विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
