। अहमदनगर । दि.15 डिसेंबर 2023 । विद्यार्थ्यांना ज्ञानार्जना बरोबर भावी आयुष्यात जीवन जगत असताना श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी उचित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी श्रम केले पाहिजे या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर एक प्रभावी माध्यम आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांचा सर्वांगीण विकास होणे शक्य असते. शिबिरात आलेले अनुभव जीवन जगत असताना उपयोगी पडतात आणि त्यांची अंमलबजावणी करणे सहज शक्य होते. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय रा.ह.दरे साहेब यांनी केले.
👉 सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : अजित पवार
रेसिडेन्शिअल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिर राहुरी तालुक्यातील श्री शाहू विद्यामंदिर खडांबे येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे, प्राचार्य विजयकुमार पोकळे सर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय नरवडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब शिंदे, सुधाकर सुंबे, कृषिभूषण सुरसिंग पवार, माजी सरपंच प्रभाकर हरिचंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंशा बापू आवारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. जालिंदर पिंपळे , प्रा.दीपक जाधव, प्रा. डॉ. म्हातारदेव म्हस्के, प्रा. भाऊराव नाडेकर, प्रा. काळे मॅडम, प्रा. पवार मॅडमउपस्थित होते.
👉बाराबाभळी, केतकी, शहापूर, पोखर्डी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा
कृषिभूषण सुरसिंग पवार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी श्रम मूल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, कौटुंबिक परिस्थिती जाणीव ठेवून यश प्राप्तीसाठी श्रम करायला शिकले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य विजयकुमार पोकळे सर यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील जनजीवन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून जवळून अनुभवता येते कसे बोलावे - कसे वागावे, आरोग्याकडे कसे लक्ष द्यावे अशा जीवनावश्यक महत्त्वपूर्ण गोष्टी यातून शिकता येतात.
👉खंडाळा गावातील बांधवांचा मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा
प्रा. दिपक जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले मन सामर्थ्यवान बनवण्यासाठी शिबिर महत्वाचे असते. शिबिरातून सहकार्याची भावना,एकात्मता, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता, सामाजिक बांधिलकी विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक आप्पासाहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल जाधव आणि संजय रोकडे सर यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.जालिंदर पिंपळे सर यांनी मानले.
👉राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने फुटबॉलपटू संग्राम गीते याचा सत्कार
