शिरसगावात बिबट्याकडून दोन कुत्र्यांची शिकार
। अहिल्यानगर । दि.08 डिसेंबर 2025 । श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगव येथे बिबट्याने कुत्र्यांच्या दोन पिल्लांची शिकार केली. रवी पवार यांच्या वस्तीजवळ कुत्र्यांची पिल्ले खातान मजूर महिलांनी बिबट्याला पाहिले. बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा बसविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
नेहरुनाना बकाल वस्तीजवळील उसात दोन बिबटे असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी याच भागामध्ये पिंजरा लावण्यात आला होता. यामध्ये एक बिबट्या जेरबंद झाला होता. मात्र, कुत्र्यांची शिकार केल्याने आता पुन्हा परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags:
Ahmednagar
