। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । सराफ बाजारात एका सोनाराच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी 82 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरले. ही घटना शहरातील सराफ बाजारात रविवारी (6 फेब्रुवारी रोजी) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
हे देखील वाचा...लग्नाला नकार दिल्याने मुलीच्या पित्यावर कोयत्याने केला हल्ला
याप्रकरणी संजय रामप्रसाद वर्मा (वय 56, रा. गुजराथी गल्ली, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्मा यांचे सराफ बाजारात संजय आर वर्मा नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. या दुकानात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन महिला आल्या.
हे देखील वाचा...पैशांसाठी मित्राचा निर्घृण खून करणारा ठरला दोषी
या महिलांनी बुरखे घातलेले होते. त्यांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दागिने पाहण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी दुकानदाराची नजर चुकवून 27 ग्रॅम 500 मिली वजनाचे 82 हजार रुपये किंमतीचे गंठण चोरले.
हे देखील वाचा...कोतवाली पोलिसांचा मावा उद्योगावर छापा : सव्वा लाखाचा मुद्देमालासह एक ताब्यात
ही बाब वर्मा यांच्या गुरूवारी (10 फेब्रुवारी) लक्षात आली. याप्रकरणी वर्मा यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मासाळकर हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा...एसटी बस प्रवासा दरम्यान सव्वादोन लाखांच्या दागिन्यांची चोरी