। अहमदनगर । दि.11 फेब्रुवारी । लग्नास नकार दिल्याने एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नगर शहरात घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार दि.10 फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीला विवाह करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी फिर्यादी यांच्या घरी गेला होता.
तेथे त्याने शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केला. त्यानंतरचा दुसरा वार फिर्यादी यांनी चुकवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पुन्हा त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर कोयत्याने वार केला.
घटनेनंतर तोफखाना पोलिसांच्या पथकाने आरोपी याला ताब्यात घेतले आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Tags:
Crime