। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी । केडगावात सुगंधी तंबाखू, सुपारी यासह इतर साहित्याचा वापर करून मशीनवर मावा तयार करण्याचा उद्योग सुरू होता. कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी माहितीच्या अधारे छापा टाकून येथून चार लाख 21 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त काला आहे.
तर तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे.
माहिती अशी की, मजनु रशीद शेख (वय 32 रा. वैष्णवीनगर, केडगाव, नगर), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील मजनु शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे पसार झाले आहेत.
केडगाव उपनगरातील वैष्णवीनगर भागात एका घराच्या परिसरात काही इसम सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्याचे मिश्रण करून मशीनवर मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. माहितीच्या अधारावर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे
यासह गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, राजु शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
best polic
ReplyDelete