| अहमदनगर | दि. ०३ जुलै २०२४ | राहुरी तालुक्यातील रामपूर येथील एका शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर महाराष्ट्र शासन असलेली नोंद कमी करण्यासाठी तलाठी यांना आदेश देणारे पत्र देण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयातील शासकीय वसुली विभागातील सुनील भागवत भवर या अधिकार्यांने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती दीड हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
💥 पोलिसांनी केली नवीन कायद्यांचे अंमलबजावणी संदर्भात जनजागृती
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तहसिल कार्यालयात शासकीय वसुली विभागातील सुनील भागवत भवर (रा.आशीर्वाद बंगला शेडगे मळा श्रीरामपूर ता श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) या अधिकार्यांकडे रामपूर येथील शेतकरी सातबारा वरील महाराष्ट्र शासन नोंद कमी करण्यासाठी कामगार तलाठी यांना आदेशाचे पञ मिळविण्यासाठी अनेक दिवसा पासुन चकरा मारीत होते.
💥 दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांची टोळी जेरबंद
सुनील भागवत भवर यांनी आदेशाचे पञ देण्यास टाळाटाळ करीत होता.काल सकाळी आदेशाचे पञ देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. रामपूर तालुका राहुरी येथे गट क्रमांक ३७२/२ क्षेत्र ६० आर इतकी शेत जमीन असून त्यापैकी ३० आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचे नाव आहे.
💥 प्रा.लक्ष्मण हाकेचे चॅलेंज स्वीकारायला डॉ.शिवानंद भानुसे तयार
सदरचे नाव हे कमी करवायचे राहिले असल्यामुळे तसे पत्र तलाठी रामपूर यांना देण्यासाठी आरोपी सुनील भागवत भवर लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे २ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती १ हजार ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
💥 विधानपरिषदेच्या जागांसाठी भाजपडून पाच नावांची घोषणा !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांनी काम पाहिले. हि कारवाई पोलीस अधीक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक, वाचक नरेंद्र पवार, पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पो ना चंद्रकांत काळे,पोशि सचिन सुद्रुक,चालक पोलीस अंमलदार दशरथ लाडआदी सहभागी झाले होते.
💥 अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली एक कोटीची खंडणी
