| अहमदनगर | दि. ०३ जुलै २०२४ |महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 2024, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये विद्यालयातील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
सदर परीक्षेस आठ विद्यार्थी पात्र झाले असून यामध्ये दोन विद्यार्थी शहरी विभाग, जिल्हास्तरीय गुणवत्ता शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. कु. अनुष्का सुभाष दरेकर, कु. कांचन नीलेश नन्नवरे उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना गावडे कांचन, भापकर सुनील, सावळे विजयकुमार, सूर्यवंशी उज्वला, पवार सुभाष, सुरसे प्रशांत, वरखडे आशा, कसबे दत्तात्रय या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते
या परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी व मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हा. चेअरमन दशरथ खोसे, सेक्रेटरी र. धों. कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, खजिनदार अॅड विजय मुनोत, विश्वस्त रमेश फिरोदिया, आर. एम. गुंदेचा, दिपक आनेचा, रश्मी येवलेकर, बन्सी नन्नवरे, मनसुखलाल पिपाडा, अभय गांधी, रमेश मुनोत, शिवनारायण वर्मा, राजेंद्र चोपडा, सचिन डागा, सुनिल गुगळे, विद्यालयाच्या प्राचार्या कांचन गावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोदकुमार कटारिया व पालकांनी अभिनंदन केले आहे.
