प्रा.लक्ष्मण हाकेचे चॅलेंज स्वीकारायला डॉ.शिवानंद भानुसे तयार


। छत्रपती संभाजीनगर । दि.01 जुलै 2024 ।  गेल्या दोन-तीन दिवसापासून प्रा. लक्ष्मण हाके यांच्या विविध चॅनेलवर मुलाखती सुरू आहेत. त्या मुलाखती च्या माध्यमातून ते मनोज जरांगे पाटील यांचे सल्लागार, समर्थक आणि आरक्षणाचे अभ्यासक यांनी या विषयावर लाईव्ह चर्चा करावी असे ओपन चॅलेंज करत आहेत. त्यांचे ह चॅलेंज स्विकारण्याची तयारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्त तथा आरक्षणाचे अभ्यासक डॉ.शिवानंद भानुसे दाखवली आहे.

💥 विधानपरिषदेच्या जागांसाठी भाजपडून पाच नावांची घोषणा

यावेळी डॉ.भानुसे म्हणाले की, प्रा.लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक, विचारवंत असल्याचे भासवत आहेत व जनतेला खोटी व चुकीची माहिती देत आहेत. जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मी प्रा.डॉ.शिवानंद भानुसे, संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे. संविधानाचा आणि आरक्षणाचा अभ्यासक आहे. 

💥  अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्षाचा प्रयत्न : ना.विखे

या नात्याने प्रा.लक्ष्मण हाके यांचे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. त्यांनी केव्हाही, कुठेही, कुठल्याही चॅनेलवर किंवा इतर ठिकाणी, या विषयावर लाईव्ह चर्चा करावी. जनतेलाही कळेल खरं काय ? खोटं काय? आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. असे ते म्हणाले आहे.

💥  संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची मोठी परंपरा : माजी आ. सुधीर तांबे 

Post a Comment

Previous Post Next Post