पोलिसांनी केली नवीन कायद्यांचे अंमलबजावणी संदर्भात जनजागृती

| अहमदनगर | दि. ०३ जुलै २०२४ | पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर अंतर्गत खर्डा पोलीस स्टेशनचे नवीन कायद्यांचे अंमलबजावणी संदर्भाने जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील खर्डा शहरात पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार व न्यू इंग्लिश स्कूल खर्डा चे मुख्याध्यापक, शिक्षक  विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची रॅली काढून खर्डा शहरातील नागरिकांना आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार्‍या नवीन कायद्यांविषयी पोलीस जीपमधील स्पीकर द्वारे माहीती दिली. 

१८६० पासुन ब्रिटीश काळा पासुन सुरु असलेले जुने कायदे केद्रशासनातर्फे बंद करण्यात आले आहेत. तर  नवीन कायदे (१) भारतीय न्याय सहिता -२०२३ (BNS) (२) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) (३) भारतीय साक्ष अधिनियम २०२३ (BSA) आज दिनांक ०१ जुलै २०२४ अशा कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली असल्याचे सपोनि विजय झंजाड यांनी सांगीतले.

तसेच प्ले स्टोअर वर नवीन कायदयांबाबत अनेक अँप उपलब्ध असुन सोशल मिडीयावरुन अधिक माहिती प्राप्त करण्याचे नागरिकांना आव्हाण केले आहे. सदर ची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी  विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली  खर्डा पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी कायद्याविषयी माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post